शिपाई होऊन रस्त्यावर उतरेल- छत्रपती संभाजीराजे



माझ्या समाजाच्या मागण्यांसाठी आणि प्रश्नांसाठी मला पक्ष स्थापन करण्याची गरज नाही. त्यासाठी मला राजकीय पदाचीही गरज नाही. मी शिपाई होऊन तुमच्या सोबत रस्त्यावर उतरून सत्ताधार्‍यांना निर्णय घेण्यास भाग पाडणार असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले आहे. 

ते गेवराई येथील जनसंवाद यात्रेमध्ये बोलत होते. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम बहुजन समाजातील विविध घटकाला इ.स. 1902 मध्ये आरक्षण दिले. वंचित घटकांना आरक्षण देऊन त्यांना इतरांच्या बराबरीत आणण्याचा तो प्रयत्न होता. सत्तर टक्के मराठा समाज हा गरीब आहे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

सत्तेत आणि बाहेर सर्व राजकीय नेत्यांनी आता एकत्र यायला हवे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. केवळ राजकारण केलं जातं. सत्तेचा उपभोग घेताय मग आरक्षण देण्याबाबतची भूमिका का घेत नाहीत. ती भूमिका आजपर्यंत घेतलेली नाही म्हणून आरक्षणाबाबत मी पुढाकार घेतल्याचे त्यांनी म्हटले.