बीड जिल्ह्यात आज 131 पॉझिटिव्ह !



जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा रविवारी 131 पर्यंत जाऊन थांबला. तब्बल 5200 रुग्णांची तपासणी केली असता 5069 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले. आष्टी आणि बीड मधील रुग्णसंख्या जास्त आहे तर सात तालुक्यातील रुग्णसंख्या दहा च्या आत आहे .


बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 09,आष्टी 33, बीड 30, धारूर 07, गेवराई 17, केज 03, माजलगाव 03, परळी 04, पाटोदा 13, शिरूर 05 आणि वडवणीमध्ये 7 रुग्ण आढळून आले आहेत .