संशोधक मीनल दाखवे भोसलेंनी गरोदर असताना घरबसल्या बनवली कोरोना टेस्ट किट

संशोधक मीनल दाखवे भोसलेंनी गरोदर असताना घरबसल्या बनवली कोरोना टेस्ट किट


●  पुण्यातील Mylab मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे-भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने या किटचं डिझाईन तयार केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे किट तयार करताना त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या.


●  पुण्यातील एनआयव्ही या संस्थेत 18 मार्च 2020 रोजी किटची पहिली चाचणी घेण्यात आली. दुसऱ्याच दिवशी 19 मार्च रोजी मीनल यांनी मुलीला जन्म दिला.


●  मग पाच दिवसात म्हणजे 23 मार्च 2020 रोजी त्यांनी अन् त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली.


●  आता घरबसल्या कोविड-19 चाचणी करता येणार आहे. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे.


●  हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक करु शकतात. महत्त्वाचं म्हणजे घरात केलेल्या चाचणीचा अहवाल अॅपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत पोहोचेल आणि तिथे तो गोपनीय ठेवला जाईल.


●  भारतात सध्या केवळ एकाच कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड (Mylab Discovery Solutions Ltd) असं या कंपनीचं नाव आहे.