धारूर घाटाच्या रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको

धारूर घाटाच्या रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको


धारूर शहरातील असलेल्या घाटामध्ये दररोज अपघात होत आहेत रस्ता अरुंद असल्यामुळे अपघाताची मालिका दररोज सुरू आहे रस्ता रुंदीकरण करावे या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ, तालुकाध्यक्ष सनी गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

गेल्या कित्येक वर्षापासून धारूर घाटातील रस्ता अरुंद आहे यामुळे दररोज अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत तरीदेखील लोकप्रतिनिधी व प्रशासन केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम करत आहे 

रस्ता रुंदीकरण करण्याची अनेक वर्षाच्या नागरिकांच्या मागणीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत असल्याने आज सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ, तालुकाध्यक्ष सनी गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य नागरिकांची उपस्थिती घाट रुंदीकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यामुळे तब्बल एक तास वाहतूक जाम झाली होती या रस्ता रोको आंदोलन आला वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया पँथर यांनीही पाठिंबा दिला होता.