लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर उडाली झुंबड,पोलिसांना करावा लागला सौम्य लाठी चार्ज
बीड जिल्ह्यात लस तुटवडा सर्वच लसीकरण केंद्र लसीअभावी बंद करण्याची वेळ. जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत .
मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते अन्य 127 लसीकरण केंद्र लसी अभावी बंद करावे लागले आहे.
आज सकाळी आरोग्य विभागाकडे केवळ 2600 लस उपलब्ध होते आज दुपारपर्यंत ते सर्व पुरतील एव्हढेच होते तसेच लस केंव्हा येणार याबाबत अधिकृतपणे आरोग्य विभागालाही माहिती नाही बीड मधील येळंब घाट येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
टिप्पणी पोस्ट करा