माजी आमदार धोंडे यांनी एक महिन्याचे पेंशन, कोविड रुग्णांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले सुपूर्द



बीडच्या आष्टी येथील भाजपचे माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी आपले एक महिन्याचे पेंशन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी सुपूर्द केले आहेत. 

राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आपला दोन दिवसांचा पगार कोविड निर्मूलनासाठी द्यावा असं आवाहन धोंडे यांनी केलंय. या दरम्यान धोंडे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

राज्य सरकार केंद्रावर अवलंबून राहिलं, राज्याने स्वतःच्या निधीतून काहीच केलं नाही, लस खरेदी करू असं ठराव घेतला परंतु हे चार महिन्यांपूर्वी केलं असतं तर इतके रुग्ण मृत्युमुखी पडले नसते अशी टीका धोंडे यांनी केलीय