डॉ. मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात



माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आज 29 एप्रिलला त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनमोहन सिंग यांना 19 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. मनमोहन सिंग यांना आधीच कोरोना लस 'कोवॅक्सिन'चे दोन डोस देण्यात आले आहेत. 

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 1990 मध्ये त्यांची पहिली शस्त्रक्रिया युनायटेड किंगडममध्ये झाली आणि 2004 मध्ये एस्कॉर्ट रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. 2009 मध्ये एम्समध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या वर्षी कोरोना काळात म्हणजेच मे महिन्यात ताप आल्याने मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.