वडवणीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न



वडवणी शहरातील चिंचवण रोडवर आसणारे एटीएम शिन फोडण्याचा प्रयत्न केला असून दोन चोरटे सीसीटिव्ही कँमेरात कैद झाले आहेत.

पोलीस स्टेशनमध्ये दुपारी उशीरापर्यत कार्यवाही करण्याच्या हालचाली सुरु होत्या. वडवणी शहरातील चिंचवण रोडवर आसणारे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम कार्यरत आहे.

याठिकाणी रात्री साडेआकरा वाजण्यच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरट्यानी तोंडाला कपडा बांधून आत प्रवेश केला व मशिनला तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

परंतू त्यांना मशीन फोडता आले नसून कोणी तरी येत आहे हे लक्षात येताच सदरील चोरट्यानी पळ काढला आहे.

तर चोरटे सीसीटिव्ही कँमेरेमध्ये कैद झाले आहेत.तर सदरील फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली.

वडवणी पोलीस कार्यवाही करण्याच्या हलचाली करत असून दुपारी एक वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.