कंत्राटी कामगारांना दिलासा देणार : मंत्री तनपुरे Will give relief to contract workers: Minister Tanpure

 


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


🧐 कंत्राटी कामगारांना दिलासा देणार : मंत्री तनपुरे


⚡ राज्यातील वीज मंडळातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.


💁‍♂️ हाँगकाँग बँक इमारत येथे वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी  बैठक झाली. तीनही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


😷 कंत्राटी कामगारांच्या मागण्या,समस्या समजून घेतल्या. याबाबत तिन्ही कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांनी अधिक माहिती घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या


💫 तीनही कंपन्या मिळून ३८ हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून कोणत्याही कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावरून काढण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात येतील. 


📌 राज्यात कार्यरत असणाऱ्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांना नियमित मानधन देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.