परळी पोलीसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला

 


[Beed Reporter] बीड जिल्ह्यामध्ये गुटख्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून बीडमध्ये वाहनाद्वारे गुटखा आणला जातो. रात्री लातूरहून परळीकडे एका जीपमध्ये गुटखा येत असल्याची माहिती संभाजी नगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी पोद्दार स्कुलजवळ जीप आडवून झाडाझडती घेतली. [Lokmat Beed Paper] या गाडीत 16 बॅग गुटख्याच्या आढळून आल्या. [Parali News Beed Paper] हा गुटखा लाखो रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वीच परळी पोलीसांनी अशाच पद्धतीने गुटख्यावर कारवाई केली होती. गुटख्याच्या गाड्या पकडल्या जातात मात्र गुटखा माफियाविरोधात कारवाई होत नाही. 

लॉकडाऊनच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गुटखा आला. अनेकवेळा पोलीसांनी गुटखा पकडलाही मात्र गुटखा माफीयाविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने गुटख्याचा सर्रासपणे काळा बाजार होत आहे. [Karyarambh Today News Beed] रात्री संभाजी नगर पोलीसांना गुप्त माहितीद्वारे एका जीपमध्ये गुटखा येत असल्याची माहिती कळाली. सदरील ही जीप लातूर येथून परळीकडे पोलीसांनी पोद्दार शाळेजवळ सापळा रचला आणि जीप ताब्यात घेवून त्याची झाडाझडती घेतली, या गाडीमध्ये 16 बॅग गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात आले.[Sakal Beed Reporter]  संभाजी नगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चाँद मेंडके यांनी गुटख्यासह जीप ताब्यात घेतली. परळीमध्ये हा गुटखा कोणाकडे येत होता हे मात्र समोर आलेले नाही. गुटख्याच्या गाड्यावर कारवाया होतात मात्र गुटखामाफिया कोण आहे, त्यांच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने गुटख्याच्या काळ्या बाजाराला तेजी आली आहे. रात्री पकडलेल्या गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यातील जीप चालक फरार असल्याचेही सांगण्यात आले.