🤔 सागरी मत्स्यव्यवसाय 6 महिन्याचे प्रशिक्षण
🤔 सागरी मत्स्यव्यवसाय 6 महिन्याचे प्रशिक्षण
⚡ नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे, याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंन्द्रात सागरी मत्सव्यवसाय नौकानयन, सागरीमासेमारीपध्दती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण आदीचे प्रशिक्षण देण्यात येते.
🧐 योजनेच्या प्रमुख अटी :
• प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
• प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
• प्रशिक्षणार्थी 18 ते 35 वयोगटातील असावा.
• प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
• प्रशिक्षणार्थी किमान 4 थी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
• प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
• प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
📄 आवश्यक कागदपत्रे : पात्रतेसंदर्भातील कागदपत्रे.
👀 लाभाचे स्वरूप असे :
• प्रशिक्षण कालावधी - 6 महिने.
• प्रशिक्षण सत्रे - 2 सत्रे (1 जानेवारी ते 30 जून व 1 जुलै ते 31 डिसेंबर).
• प्रशिक्षणार्थी क्षमता - 22 प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
✔ प्रशिक्षणार्थी शुल्क - दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा 100 रुपये /-
✔ दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा 450 रुपये /-
🏢 या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय.
टिप्पणी पोस्ट करा