📱 'Microsoft Surface Duo' लवकरच होणार लाँच


⚡ मायक्रोसॉफ्ट सर्फेस ड्युओ हा स्मार्टफोन 10 सप्टेंबरला लाँच होणार आहे.


💫 मायक्रोसॉफ्टच्या या ड्युअल स्क्रीन फोनची सुरुवातीची किंमत 1399 डॉलर्स म्हणजेच जवळपास 1.04 लाख रुपये असणार आहे.


🧐 फीचर्स :


▪️ प्राप्त माहितीनुसार, सर्फेस ड्युओमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसह 6 जीबी रॅम आणि 64 जीबी/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळू शकते. 


▪️ या फोनमध्ये 11 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा असेल. म्हणजे रिअर आणि फ्रंटसाठी एकच कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.


▪️ या फोनमध्ये 5.6 इंच एमोलेड डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझॉल्यूशन1800×1350 पिक्सल असेल. 


▪️ डिस्प्लेची पिक्सल डेंसिटी 401पीपीआई असेल. फोनच्या डिस्प्लेला कोणत्याही अँगलन फिरवता येईल. 


▪️ फोनमध्ये अँड्रॉईड 10 मिळेल. सोबतच 3460mAh बॅटरी आणि 4जी एलटीई सपोर्ट सोबत हा फोन लाँच केला जावू शकतो.


📌 दरम्यान, फोनच्या किंमतीची माहिती मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉगमध्ये दिली असून लाँचिंगबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.