🤓 ...म्हणून अंजीर खायला हवे!


बजारात ताज्या अंजीरप्रमाणेच सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. या अंजीरमध्ये असणारे विविध तत्व आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आज आपण त्याबाबत जाणून घेऊयात...

1. ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. कारण त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात.

2. यामध्ये कॅल्शियम घटक भरपूर प्रमाणात असल्याने हाडांना मजबुती मिळते.

3. यामध्ये फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते.

4. यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

5. यामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड असतात. हृदयाचे आजार आटोक्‍यात राहण्यास मदत होते.

6. यामध्ये व्हिटॅमिन 'इ' आणि 'के' चांगल्या प्रमाणात असल्याने केसांची नैसर्गिक चमक आहे तशीच राहते.

7. सुके अंजीर गुडघ्याचे दुखणे कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

8.  हे अँटीऑक्‍साडेंटच प्रमुख स्त्रोत असल्याने शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करून वेगवेगळ्या आजारापासून बचाव करते.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.