महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी लोकांना पैशाचे वाटप ? घटनेचा Video Viral

आज महाविकास आघाडीतर्फे मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महामोर्चामध्ये पैसे देऊन आणलं गेलं होतं असा आरोप विरोधकांकडून होत असतानाच लोकांना होत असलेल्या पैसे वाटपाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे. 



सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कांग्रेस कार्यालया जवळ हे पैसे वाटप सुरु होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करणार महामोर्चाचं फ्लेक्स सुद्धा दिसून येत आहे.