🎬 आयुष्मानच्या तब्बल 5 चित्रपटांचा साऊथमध्ये बनणार रिमेक


अभिनेता आयुष्मान खुरानाने नेहमीच उत्तम आशयाच्या फिल्म्सद्वारे, चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

आयुष्मानचे हे काम दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळेच आयुष्मानचे तब्बल 5 चित्रपट दक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक होणार आहेत.

'अंधाधुन' हा तेलगू आणि तामिळ भाषेत, 'ड्रीम गर्ल' तेलगूमध्ये, 'विक्की डोनर' तमिळमध्ये बनविला आहे. याखेरीज तामिळमध्ये 'अनुच्छेद 15' आणि तेलगूमध्ये 'बधाई हो' बनविण्याच्या सुरु आहे.

🗣️ आयुष्मान म्हणतो : 

● माझ्या बर्‍याच चित्रपटांचे रिमेक होत आहेत, हे पाहून खूपच समाधान आणि संतुष्ट आहे.
● मुख्य म्हणजे हे चित्रपट दक्षिणेत बनत आहेत हे आश्चर्यचकित करणारे आहे.
● सिनेमाची खरी कसोटी हीच आहे की, चित्रपट किती जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.
● मला आनंद आहे की, माझे चित्रपट सीमा ओलांडत आहेत.


साऊथ मुव्हीज