💥 विजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू


परळी बातम्या : गळ्यामध्ये नगरपालिकेचा पास घालून विजेच्या खांबावर चढलेल्या तरुणाचा शॉक बसून मृत्यू झाला. खांबावर कशामुळे चढला असा प्रश्न उपस्थित होत असून परळी शहरामध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
🧐 नित्रूड व कुंडी परिसरातील गावे कंटेनमेंट झोन घोषित!
शेख इस्माईल शेख मुस्तफा असे मयताचे नाव आहे. शेख इस्माईल हा परळी नगर परिषदच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राट तत्वावर कामास होता. तो विजेच्या मेन लाईनच्या खांबावर चढला होता.
💥 धक्कादायक; बीडमध्ये कोरोनासाठी स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा आयसोलेशन वार्डमध्ये मृत्यू
शॉक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र तो विजेच्या खांबावर काय करीत होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेख इस्माईल यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आई-वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर