😱 कोरोनाचे संकट टळावे म्हणून पुजाऱ्याने देवीला दिला नरबळी
⚡ भारत देश कोरोना विषाणूच्या साथीशी लढत असताना एकीकडे लस, औषधे यांवर चर्चा आणि संशोधन चालू आहे, मात्र दुसरीकडे या विषाणूची साथ घालवण्यासाठी नरबळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
😰 ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील एका मंदिराच्या पुजार्याने कोरोना विषाणूचे संकट टळावे म्हणून, एका व्यक्तीला ठार मारून देवीला नरबळी दिला आहे.
👮🏻 नरसिंहपूर बंधहुडा गावात एका व्यक्तीचा मृतदेह ब्राह्मणी देवी मंदिर परिसरात सापडला. स्थानिक पोलिसांनी या हत्येमध्ये वापरली गेलेली शस्त्रे जप्त केली आहेत.
💁♂️ पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन या घटनेचा तपास सुरू केला आहे. संसारी ओझा (वय 70 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.
🗣️ आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी त्याला देवी मंगलाने स्वप्नात सांगितले होते की, नरबळी दिल्यावर इथला परिसर कोरोना महामारीपासून मुक्त होईल.
🔪 यानंतर बुधवारी रात्री, जेव्हा गावातील 55 वर्षीय सरोज प्रधान नावाची व्यक्ती मंदिरात पोहोचली, तेव्हा पुजाऱ्याने योजनेनुसार धारधार शस्त्राने त्याचे डोके धडापासून वेगळे केले.
📍 देवीला हे बलिदान दिल्यानंतर आरोपी पुजारी संसारी ओझा याने नरसिंहपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले, त्यावेळी पुजारीचे हात, पाय आणि संपूर्ण शरीर रक्ताच्या डागांनी माखलेले होते.
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर


टिप्पणी पोस्ट करा