💥 दिराने केला विनयभंग... .


नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदळ्याची वाडी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. दिरानेच भावजईचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरी विनयभंगाची घटना येळंब या ठिकाणी घडली.
बाळासाहेब रघुनाथ तांदळे ४० वर्षे रा. तांदळ्याची वाडी याने आपल्या ३५ वर्षीय भावजईचा विनयभंग केला. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कर्मचारी दयानंद शिंदे, युनूस बागवान हे करत आहे. दुसरी विनयभंगाची घटना याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळंब या ठिकाणी घडली.
बाळासाहेब झिंगु काळे ५५ वर्षे याने एका महिलेची छेडछाड केल्याने त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी कैलास बामदळे, दिपक खांडेकर हे करत आहे.


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर