💥 उसन्या पैशाच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण
केज तालुक्यातील टाकळी येथे उसन्या पैशाच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
२२ मे रोजी सायंकाळी ६:०० ते ६:१० वा.च्या सुमारास कबीर बुवांचे शेत नावाच्या शेता जवळील पाण्याच्या टाकी जवळ आदित्य शिवाजी बारगजे वय २९ वर्ष व त्याचा मित्र हे मोटार सायकलवरुन टाकळी येथील घरी जात होते.
त्यावेळी विनायक व्यंकट बारगजे, भिवाजी व्यंकट बारगजे,गवळण व्यंकट बारगजे रा. टाकळी व पिनू बंडू चाटे रा.तांबवा या चौघांनी त्याला अडवून उसन्या पैशाच्या कारणावरून मारहाण केली.
भिवाजी व्यंकट बारगजे यांनी आदित्य यास कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. तर व्यंकट याने लोखंडी गजाने मारहाण केली.
तसेच भिवाजी आणि गवळण यांनी दगडाने मारून जखमी केले. या प्रकरणी फिर्यादी आदित्य बारगजे यांच्या फिर्यादी नुसार २९ मे रोजी केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. २००/२०२० भा.दं.वि.३०७,३४१,३२३,५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp
टिप्पणी पोस्ट करा