नॅशनल पेन्शन सिस्टमच्या नियमात होणार बदल

 नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे नॅशनल पेन्शन सिस्टमच्या ग्राहकांना जर आंशिक रक्कम काढायची असेल तर 1 जानेवारी 2023 पासून त्यात बदल होणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पीएफआरडीएने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे.



पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटने 23 डिसेंबर 2022 ला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आता कोरोना महामारीशी संबंधित नियम रद्द केल्यानंतर आणि लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यानंतर सर्व सरकारी क्षेत्रातील अर्थात केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या ग्राहकांना आता आंशिक पैसे काढण्यासाठी त्यांचा अर्ज फक्त त्यांच्या नोडल ऑफिसरकडे जमा करावा लागणार आहे.

आंशिक पैसे काढण्याचे नियम काय?

▪️एनपीएसमध्ये किमान 3 वर्षे गुंतवणूक (योगदान) असणे गरजेचं आहे.

▪️ ग्राहक त्याच्या एकूण योगदानापैकी 25% रक्कम काढू शकतात.

▪️ एनपीएसचा सदस्यता कालावधी संपेपर्यंत ग्राहक तोवर जवळजवळ 3 वेळा पैसे काढू शकतात.

▪️ ग्राहकाला काही अति महत्वाच्या कारणामुळे आंशिक रक्कम काढता येईल – 1) मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 2) मुलांच्या लग्नासाठी 3) नवीन घर खरेदी/(काही अटींवर) नवीन घर बांधण्यासाठी 4) गंभीर आजारासाठी.


एनपीएसमधून पैसे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

▪️ पॅन कार्डची फोटो कॉपी

▪️ रद्द केलेला चेक (कॅन्सल्ड चेक)

▪️ नॅशनल पेन्शन स्कीमसारख्या मिळालेल्या रकमेची पावती

▪️ तुमचे ओळखपत्र जसे की, आधार कार्ड, रेशन कार्ड वगैरे.