आज ठोकर मारायची, उद्या पाया पडायचं चालणार नाही. असे कोणीही करतात. अंधारे
अंधारेंनी लेखी माफी मागावी', आज ठोकर मारायची, उद्या पाया पडायचं चालणार नाही
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील संतांबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद थांबताना दिसत नाही.
अंधारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून राज्यभरात निषेध नोंदवण्यात येत आहे.
सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत वारकरी संप्रदायाची माफी मागितली होती. मात्र आता त्यांनी लेखी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी सुषमा अंधारेंनी लेखी माफी मागायला हवी, अशी मागणी केली आहे.
आज ठोकर मारायची, उद्या पाया पडायचं चालणार नाही. असे कोणीही करतात. अंधारे यांनी लेखी माफी मागावी, असं गणेश महाराज शेटे म्हणाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा