पुण्यात नव्या पोलीस आयुक्तांची आरोपींकडून गोळीबार करत सलामी?
पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच काही वेळातच गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील वारजे येथील रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबार करण्यात आला. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात मोठं दहशतीचं वातावरण पसरलं आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांना सलामी दिल्याची चर्चा रंगली आहे.
पुणे : पुण्यात नव्या पोलीस आयुक्तांना आरोपींकडून गोळीबार करत सलामी? भर रस्त्यात गोळीबार pic.twitter.com/he6ufG1tlD
— Maharashtra Times (@mataonline) December 17, 2022
कार्तिक इंगवले असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे. कार्तिकने दारू पिऊन नशेत असताना हा गोळीबार केला आहे. कार्तिक इंगवलेचा मित्र वेताळ बाबा चौकामधून चालला होता. त्यावेळी कार्तिकने त्या मित्राकडून ५०० रूपये मागितले होते. त्याने पैसे नाही दिले म्हणून कार्तिक इंगवलेने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही.
गृहखरेदीच्या नियमांचे खांब भक्कम; चार कलमांचे पालन आवश्यक; महारेराचे आदेश
गोळीबार करून आरोपीने तिथून पळ काढला. भर रस्त्यात गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जातेच कशी? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आताच रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा