पोरांनो लागा तयारीला मीरा भाईंदर महानगरपालिकेत बंपर भरती, ८० पगार

मिरा भाईंदर महानगर पालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदे भरली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.



पालिकेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) (Medical Officer (Genecology & Obstetrics),), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), औषध निर्माण अधिकारी (Drug Manufacturing Officer), प्रसविका (Obstetrician) ही पदे भरली जाणार आहेत.


मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एम.डी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

मेडिकल ऑफिसरची ९ पदे भरली जाणार आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीबीएस पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

औषध निर्माण अधिकारीचे १ पद भरले जाणार असून महाराष्ट्र बोर्डाच्या विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. फार्म पदवी उत्तीर्ण असावे. उमेदवारांकडे महाराष्ट्र फार्मसी काऊन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना मराठीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

प्रसविका पदासाठी उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ए.एन.एम अभ्यासक्रम, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १८ ते ३८ वर्षे वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) पदासाठी २७ डिसेंबर तर वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका या पदांसाठी २८ डिसेंबर २०२२ रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे ४०११०१ या पत्त्यावर उपस्थित राहावे लागेल.