मुख्यमंत्र्यांकडून अधिकारांचा गैरवापर? शिंदेंनी 83 कोटींची जमीन 2 कोटीत वाटली

 नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टच्या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना हि जमीन १६ लोकांना वाटण्यात आल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येताना दिसत आहेत. 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत त्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. शिंदे हे मागील सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना घेतलेल्या नागपूर न्यासाच्या जमीन वाटपाला कोर्टाने स्थगिती दिली. 

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. एनआयटी जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, अधिकाऱ्यांनी जमिनीच्या वाटपास विरोध केला असताना देखील शिंदेंना काय प्राप्त करायचं होत? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थिस केला आहे . आव्हाड एबीपी माझाशी बोलत होते. 

८३ कोटी किमतीच्या जमिनीचे अवघ्या २ कोटींमध्ये वाटप करण्यात आल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे.