दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, लेखी परीक्षा या तारखेपासून..!!
महाराष्ट्रात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4000 जागांवर भरती असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली. ही भरती प्रक्रिया ‘टीसीएस’च्या माध्यमातून पार पडणार असल्याचेही ते म्हणाले.
Advertisement
मेडिकल बोर्ड तयार करणार
नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना महाजन म्हणाले, की ‘एमपीएससी’च्या माध्यमातून डाॅक्टरांच्या 300 जागा भरल्या असून, सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या भरतीसाठी आम्ही मेडिकल बोर्ड तयार करुन त्या माध्यमातून लवकरच पदभरती केली जाईल.
आतापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल नि 90 टक्के हाफकिन, अशी औषध खरेदी केली जात होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन असा प्रमाणात औषधे खरेदी केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा