बावनकुळे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

 "मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

बावनकुळे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे.


बावनकुळे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे. 

एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपाला शरण गेला आहे. भाजपाच्या मनात देवेंद्र फडणवीसांनीच राज्याचे नेतृत्व करावं हे भाजपच्या मनात आहे, याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. चंद्रशेखऱ बावनकुळेंचं वक्तव्याचा गांभीर्याने विचार शिंदे गटाने केला पाहिजे, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी एबीपी माझाशी बोलत होते . 

बावनकुळे यांच्या विधानावरून हे स्पष्ट आहे, की त्यांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य नाही, लवकरच त्यांचा राजकीय गेम करून देवेद्र फडणवीसांना परत  सत्तारूढ करण्यासाठी आसूसलेले आहेत.” असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.