ओमिक्रॉन BF.7 चं मुख्य लक्षण Hyposmia, नाकात होते वाढ

चीनमध्ये एका दिवसात 3.5 कोटी कोविड-19 ची प्रकरणे समोर आली. विविध मीडिया पार्टनर्स द्वारा दिल्या गेलेल्या रिपोर्ट्सनुसार अशी माहिती मिळत आहे की Omicron BF.7ने चीन वर अक्षरश: हल्लाबोल केला आहे. पण आता संक्रमण हाताबाहेर जाऊ लागल्याने चीन सरकारने रोजची अधिकृत आकडेवारी देणे बंद केले आहे. यामुळे संशय अधिक बळावत चालला आहे की नेमके किती लोक तिथे कोरोना बाधित आहे हे काही जाणून घेता येत नाही आहे.



Zoe Health Study ने कोविड-19 च्या मुख्य लक्षणांची एक यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये हाइपोस्मिया (Hyposmia) चा देखील समावेश होता. कोविड-19 चे हे लक्षण नाकात जाणवते. जे संक्रमण झाले असल्याचे खात्रीशीर सांगते. चला तर जाणून घेऊया की हाइपोस्मिया नक्की आहे तरी काय आणि तो कसा ओळखावा?

हे आहे एक प्रमुख लक्षण

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला ओमिक्रॉन बीएफ.7 ची लक्षणे जाणून घ्यायची आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, सजून असे काहीच ठोस मिळालेले नाही जे दाखवू शकेल की ओमिक्रॉनची लक्षणे कोविड-19 पेक्षा वेगळी आहेत. याच आधारावर हायपोस्मिया सुद्धा ओमिक्रॉनचे एक प्रमुख लक्षण मानले जाऊ शकते. तुम्हाला जर हायपोस्मियाचा त्रास झाला तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण नक्की हायपोस्मिया आहे तरी काय? चला जाणून घेऊया.

हायपोस्मिया काय आहे?

कोविड-19 जेव्हापासून सुरू झाला आहे तेव्हापासूचनच हायपोस्मियाकडे एक प्रमुख लक्षण म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. जर हे लक्षण एखाद्या व्यक्तीत दिसले तर डॉक्टरही कोरोनाची केस आहे असे तेव्हाची समजायचे आणि आजही समजतात. कारण हे लक्षण आहेच एवढे महत्त्वाचे की थेट ते कोरोन झाल्याचे दर्शवते. मेडिकल न्यूज टुडे यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, हायपोस्मिया हे नाकाद्वारे जाणवणारे एक लक्षण आहे. ज्यात व्यक्तीची वास 

हायपोस्मियाचा भाऊ एनोस्मिया

हायपोस्मियासोबत आपण एनोस्मियाबाबत (Anosmia) जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण हायपोस्मिया जेव्हा गंभीर स्तरावर पोहोचतो तेव्हा त्यातूनच एनोस्मिया तयार होतो. एनोस्मियामध्ये रूग्णाची वास घेण्याची संवेदना (Lost Of Smell) पूर्णपणे संपते. त्या व्यक्तीच्या नाकाला कोणत्याही प्रकारचा वास जाणवत नाही. कोविड-19 च्या पहिल्या लाटेत हेच लक्षण प्रमुख लक्षण म्हणून समोर आले होते. म्हणूनच हे लक्षण दिसल्यास त्वरित उपचार घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे.