बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार Baby growth stages and diet
पहिला महिना - मान सावरणे, आईला ओळखणे, वजनात १/२ ते १ किलो वाढ.
दुसरा महिना - बाळाची नजर स्थिर होते, बाळ हसते.
तिसरा महिना - हालचालीत वाढ, आवाजाच्या दिशेने प्रतिसाद.
चौथा महिना - हातात वस्तू पकडणे, मांडीवर टेकून बसणे.
पाचवा महिना - ओरडणे, वस्तूचा शोध घेणे,जन्म वजनाच्या दुप्पट वजन.
सहावा महिना - आधार दिल्यास खुर्चीत बसू शकते.
वयोगटानुसार बाळाचा आहार
० ते ६ महिने - बालकास आहार म्हणून फक्त स्तनपानच दयावे . बरेचदा नवीन माता झालेल्या महिलांना प्रश्न पडतो की ह्याचे प्रमाण काय असावे ? दिवसातून कितीवेळा स्तनपान दिले पाहिजे किती वेळाने दिले पाहिजे. तर ह्याबाबत पहिल्या सहा महिन्यात निश्चित असा काही नियम नाही बाळाच्या मागणीनुसार बाळाला स्तनपान देणे हा सर्वात उत्तम आणि सोपा पर्याय आहे.
. स्तनपानाचे बाळास मिळणारे फायदे -
- मातेचे दूध हे परिपूर्ण अन्न आहे.
- मातेचे दुध पचनास सोपे असते.
- मातेचे दूध आरोग्यवर्धक आणि निर्मळ, जंतुविरहित असते.
- मातेचे दूध बाळाचे विविध आजारांपासून संरक्षण करते.
म्हणूनच डॉक्टर पहिले ६ महिने बाळाला फक्त स्तनपान देण्याचा सल्ला देतात.
आमच्या पुढील बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार भाग - २ मध्ये ६ ते ९ महिन्याच्या बालकांच्या विकासाचे टप्पे आणि आहार ह्याबाबत माहिती वाचायला विसरू नका.
टिप्पणी पोस्ट करा