'भारतात एक दिवस असा येईल की हिंदूंपेक्षा मुस्लिम जास्त असतील', लव्ह जिहादवर हे काय बोलून गेलेले नसिरुद्दीन शाह
नसीरुद्दीन शाह वादग्रस्त वक्तव्य
नसीरुद्दीन शाह यांनी धर्मसंसद, मुघल, भारत देश, नुपूर शर्मा अशा अनेक प्रकरणांवर आपली मत मांडली. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली.
धर्मसंसदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
मागील वर्षी डिसेंबरमध्ये मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शाह चर्चेत आले होते. १७ ते १९ डिसेंबर या काळात हरिद्वार इथे झालेल्या धर्मसंसदेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आम्ही २० कोटी जनता हार मानणार नाही. इथे आमच्या पिढ्या, कुटुंब आहेत. आम्ही २० कोटी लोकांच्या हक्कांसाठी लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मुघलांबाबत केलं होतं स्टेटमेंट
नसीरुद्दीन शाह यांनी भारतात मुघलांनी केलेल्या अत्याचाराशिवाय त्यांचा इतिहास गौरवशाली असल्याचं म्हटलं होतं. मुघलांनी देशाला संगीत, नृत्य कला, ऐतिहासिक वास्तू अशा अनेक गोष्टी दिल्या. मुघलांचं योगदान मोठं असल्याचं ते म्हणाले होते.
लव्ह जिहाद
लव्ह जिहादवरही त्यांनी वक्तव्य केलं होतं. लव्ह जिहादच्या नावाने चालवली जाणारी मोहिम तमाशा आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यातील सामाजिक संपर्क रोखता यावा यासाठीच हे केलं जात आहे. भारतात एक दिवस असा येईल, हिंदूंपेक्षा मुस्लिम जास्त असतील. मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंनाही मागे टाकेल असंही ते म्हणाले होते.
भारताची भीती वाटते
मला आजच्या भारताची भीती वाटते असंही शाह म्हणाले होते. माझ्या मुलांची मला काळजी वाटते. आजच्या स्थितीत मी कल्पना करतो की, संतापलेल्या जमावाने माझ्या मुलांना घेरलं आहे आणि त्यांनी तुम्ही मुस्लिम आहेत की हिंदू असा प्रश्न विचारला जातो आहे. माझ्या मुलांकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल कारण आम्ही आमच्या मुलांना धार्मिक शिक्षण दिलेलं नाही. मी मुसलमान आहे आणि माझी पत्नी हिंदू आहे. धर्माच्या नावाखाली भारतीय समाजात विष पसरवलं जात असल्याचं ते म्हणाले होते.
नुपूर शर्मा
नुपूर शर्माने प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, नपूर शर्मांनी सांगितलं, की हिंदू देवी-देवतांवर केलेल्या आक्षेपार्ह टिपणीमुळे अशी घटना घडली. मला त्यांनी असे व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग दाखवावं, ज्यात देवी-देवतांवर अशाप्रकारे टिपणी करण्यात आल्या होत्या. नसीरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होती.
टिप्पणी पोस्ट करा