परळीत ४५ हजार रुपये हडपले; महावितरणचा ग्राहकांना अलर्ट

अनोळखी क्रमांकावरून वीज ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी फसवे मॅसेज व्हॉट्सअप येत आहेत. वीज देयक भरणा व केवायसी अपडेट करण्यासाठी सदरील मॅसेज असून ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन वीज वितरण कडून करण्यात येत आहे. परळी येथील शारदानगर येथील रहिवासी एस. जी. स्वामी यांना अशाच प्रकारच्या फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या खात्यातून तब्बल ४५ हजार रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.

वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्स अप वर तुमचा वीज कंज्युमर नंबर डिस्कनेक्ट केली जाईल. जर तुमचा केवायसी आज रात्री 9.30 वा पर्यंत अपडेट केला गेला नाहीत तर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल, तसेच वीज कार्यालयातून आपले केवायसी अपडेट करणे बाकी आहे कारण तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट केले गेले नाही. कृपया आमच्या वीज अधिकारी 9123739692 शी त्वरित संपर्क साधावा या प्रकारचे संदेश प्राप्त होत आहेत. वीज ग्राहकांनी या नंबर वरून आलेल्या मॅसेजकडे दुर्लक्ष करून कोणतीही खाजगी माहिती इतरांना देऊ नये, असे आवाहन वीज वितरण कंपनी कडून करण्यात येत आहे.

अनकेदा वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत. महावितरणच्या नावाखाली सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीने वीज वितरण ग्राहकांना फसवण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार परळीमध्ये झाला असल्याने आता वीज वितरण कंपनीकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारचे मेसेज वीज वितरण कंपनी टाकत नाही. कोणत्याही नंबरवर तुम्हाला मेसेज द्वारे कॉल करण्यासाठी सांगत नाही. त्यामुळं सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांपासून सावध राहा, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा आय लव बीड अ‍ॅप

सायबर क्राईमद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. अनेकांना मोबाइलवर ओटीपी आल्याचं सांगून त्यांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सायबर गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा आय लव बीड अ‍ॅप