अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला 14 मे रोजी अटक झाली होती. या प्रकरणी केतकीवर राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले. तर आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने केतकीला दिलासा आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जुन्या अॅट्रॉसिटी प्रकरणात जामीन मंजुर केला.
✨ जिल्हा सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. केतकीने यासंदर्भात मु्ंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात केतकीने गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केलीय.
👉 याचिकेत तिने सोशल मीडियावर आपण पवार नावाच्या व्यक्तीबद्दल पोस्ट केली असली तरी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पवार व्यक्तीचे नाव नाही. माझ्याविरोधात पवार नावाच्या व्यक्तीने तक्रार किंवा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे अशी याचिका केतकीने मुंबई हायकोर्टात केली आहे.
📍 दरम्यान, केतकीने आपल्यावरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोशल मीडियावर आपण पवार नावाच्या व्यक्तीबद्दल पोस्ट केली असली तरी, माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पवार व्यक्तीने नाव नाहीत.
📌 म्हणजेच पवार नावाच्या कोणत्याही व्यक्तीने माझ्याविरोधात तक्रार किंवा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी मला अटक कशी काय केली असा सवाल केतकीने केला आहे. त्यामुळे दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे अशी याचिका केतकीने मुंबई हायकोर्टात केली आहे.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
टिप्पणी पोस्ट करा