अजित पवारांना बोलू दिले नाही,राष्ट्रवादी महिला सेलकडून निषेध
दोन दिवसांपुर्वी देहू-आळंदी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला शाखेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला. 14 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस, भाजपा राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थानचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे अशा मान्यवरांची उपस्थिती होती.
असे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही. या घटनेचा निषेध जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी विमलताई निंबाळकर, मिनाक्षी देवकते, सय्यद शकीला रेहाना पठाण, जेबा शेख, अनिताताई वाघमारे, श्रीमती चाळक आणि मंगलताई जगताप अशा पदाधिकारी उपस्थित होत्या.
बीड जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा आय लव बीड अॅप
टिप्पणी पोस्ट करा