भंडारा जिल्ह्यातील निर्माणाधीन उड्डाणपुलाची काही सुंदर छायाचित्रे
भंडारा जिल्ह्यातील निर्माणाधीन उड्डाणपुलाची काही सुंदर छायाचित्रे
🚗 भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर लाखनी आणि साकोली शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. आता या दोन्ही उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.
🛣️ यामुळे गेल्या काही दिवसात दोन्ही शहरातील किंवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणी जरी निर्माण झाल्या असतील तरी येणाऱ्या काळात हा प्रवास अत्यंत सोयीस्कर आणि सुखकर होणार आहे. याच जवळपास पूर्ण होत आलेल्या लाखनी शहरातील उड्डाणपुलाचे संध्याकाळी घेतलेले काही खास छायाचित्रे समोर आली आहेत.
🚌 संध्याकाळच्या सुमारास अतिशय सुंदर दिसनारा असा हा उड्डाणपूल येणाऱ्या काही दिवसांमध्येच उद्घाटनानंतर नागरिकांना प्रवास करण्यासाठी खुला होणार आहे. या उडानपुलावरून प्रवास करण्यासाठी मात्र आणखी काही दिवस नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा