राज्यात आज सार्वजनिक सुट्टी; बँका, सरकारी कार्यालये, शाळा बंद


 

राज्यात आज सार्वजनिक सुट्टी; बँका, सरकारी कार्यालये, शाळा बंद

⚡ भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

💁‍♂️ परक्राम्य संलेख अधिनियमानुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याने राज्य सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांही या काळात बंद राहतील.

🧐 भारतरत्न लता मंगेशकर यांचे दु:खद निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

👉 ही सुट्टी राज्य सरकारला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परक्राम्य संलेख अधिनियमानुसार जाहीर करण्यात आलेली असल्याने सर्व सरकारी कार्यालये, शाळा, केंद्र सरकारची राज्यातील कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बंद राहतील.

📍 केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असल्याने या काळात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत.