वर्ल्डकप जिंकताच BCCI कडून ‘मोठी’ घोषणा

 


वर्ल्डकप जिंकताच BCCI कडून ‘मोठी’ घोषणा

👑 भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप पटकावला आहे. 

👍 स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या भारताच्या यंगिस्तानचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकजण ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन करत आहेत. 

🗣️ बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या या विश्वविजेत्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे.

💫 वर्ल्डकपविजेत्या प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखाचे बक्षीस जय शाह यांनी जाहीर केले आहे. 

📍 त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केल्याचे शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटले.