Banner war in Pune city! What exactly is the case? Get to know
पुणे शहरात रंगलं बॅनर युद्ध! नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या
⚡ आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बॅनरबाजीचं अनोखं उदाहरण पहायला मिळत आहे. नुकताच प्रभाग आराखडा जाहीर झाला आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात बॅनरबाजी सुरू केली आहे.
👉 वेगवेगळ्या पाट्यांसाठी पुण्याची ओळख आहे. पुणेरी पाट्या आणि त्यावरील मजकूर हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या पाट्यांच्या अथवा बॅनरच्या माध्यमातून पुणे शहरात राजकीय वाकयुद्ध नेहमीच पाहायला मिळत असते.
🤔 नेमकं प्रकरण काय? :
● पुण्यातील सानेगुरुजी नगर येथील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी एक बॅनर लावले होते. मुळातच वेगवेगळ्या पाट्यांसाठी पुण्याची ओळख आहे. 'जिथे गरज तिथे धीरज' असा मजकूर त्यावर आहे.
● कोणत्याही मदतीसाठी एक कॉल करा असे सांगून वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे मोबाईल नंबर या बॅनर वर दिले आहेत. मागील दोन दिवसांपासून प्रभाग क्रमांक 17 मध्ये हे बॅनर झळकत आहे. परंतु या बॅनर विरोधात देखील आता बॅनरबाजी सुरू झाली आहे.
● अज्ञात व्यक्तीने नगरसेवक धीरज घाटे यांनी लावलेल्या बॅनर खालीच विरोधात्मक बॅनर लावले असून, "धीरज... आम्हाला नाही तुझी गरज.. आता घरी जा परत.." नको बापट नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख... असा या बॅनरवर मजकूर आहे. या बॅनर बाजीची पुणे शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा