अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या
● अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी ४४ जणांना काेराेना संसर्गाचे निदान; जिल्ह्यात सध्या ३७५ काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
● स्थगिती असूनही श्रीरामपूरमध्ये ओबीसी जागेवर निवडणूक घेतली; अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने नाेटीस काढून कारवाई का करू नये, अशी केली विचारणा
● बहुजन समाज पक्षात गेलेले सचिन जाधव यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश; मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री शंकरराव गडाख, युवासेनेचे विक्रम राठाेड यांच्या उपस्थितीत मुंबईत केला पक्षप्रवेश
● साैरभ चाैरे मृत्यूप्रकरणी संबंधित ठेकेदाराविराेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण
● सावेडीतील मधुबन काॅलनी येथे वृक्षताेड; उपमहापाैर गणेश भाेसले यांच्याकडून पाहणी करून फाैजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
● कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या सक्तीला विराेध; बहुजन मुक्ती पक्ष अहमदनगरसह राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साेमवारी करणार आंदाेलन
● संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी व आंबीदुमला गावात चाेरांचा धुमाकुळ; आठ ठिकाणी घरफाेड्या करत लाखाे रुपयांचा ऐवज लंपास
● नेवासे, राहुरी आणि पाथर्डी येथील वस्त्यांवर दराेडे घालणाऱ्या टाेळीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
● संगमनेर येथील चिंचेवाडीत टेम्पाे आणि ट्रॅक्टरचा अपघात; चालक सुनील माेहपे यांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी
● अकाेले तालुक्यातील काेतूळ-अंभाेळ रस्त्यावर दुचाकी आणि कार अपघातात नितीन काेरडे या युवकाचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप

टिप्पणी पोस्ट करा