संपामुळे बँकेची सर्व कामे ठप्प, ग्राहकांचे हाल

 


संपामुळे बँकेची सर्व कामे ठप्प, ग्राहकांचे हाल   

⚡ राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बँकांचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी काल आणि आज असा दोन दिवस संप पुकारण्यात आला आहे.

👉 या संपात सात लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बँकांचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

👀 या संपामध्ये युनाइटेड फोरम ऑफ बँक्स युनियन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, इंडिया बँक एप्लॉईज असोशियशन या तीन प्रमुख संघटनांसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. तब्बल सात लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.

💰 कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे दैनंदिन बँकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. चेक स्वीकारणे, चेक  विड्रॉल करणे, लोन मंजुरी, लोन जमा करणे अशा सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्य ग्राहक अडचणीमध्ये सापडले आहेत.