ब्रेकिंग! सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन


 ब्रेकिंग! सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन 

▪️ भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. 

▪️ सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. 

▪️ महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते अशी माहिती मिळते आहे. 

कोण होते बिपीन रावत? : 

▪️ 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. 

▪️ लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक. 

▪️ बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली.

▪️ बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले.

▪️ रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट'. 

▪️रावत यांचा 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित.

▪️ सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव.