ना.धनंजय मुंडे यांच्या एकाच फोन वर व्यंकटेश शिंदे यांचे उपोषण मागे
प्रदीर्घ काळापासून नागरिकांनी चाळीस फूट रोड कन्या शाळा रोडला जोडण्याची केलेली मागणी अत्यंत महत्वाची असून हा प्रश्न अत्यंत जिव्हाळयाचा असल्याने महिनाभरात तो सोडवूत, असे आश्वासन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे व नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनीदिल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी आज आपले उपोषण तिसर्या दिवशी मागे घेतलेआहे. दरम्यान उर्वरित सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर काही प्रश्नांवर लगेचच नगर परिषदेने काम सुरू केले असून ही अत्यंत समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया व्यंकटेश शिंदेयांनी दिली आहे.
परळी शहरातील कन्या शाळेला जोडणारा चाळीस फुट हा रस्त्याचा प्रश्न व्यंकटेश शिंदे यांनी उपोषणाच्या माध्यमातून ऐरणीवर आणल्यानंतर आज त्यावर पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी तातडीने मध्यस्थी करीत महिनाभरात हा प्रश्न निकाली काढूत, असे आश्वासन दिले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी शिवतीर्थावर नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदेयांची भेट घेवून उपोषणास बसलेले तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. आपले प्रश्न अत्यंत न्याय असून त्यावर आम्ही तातडीने काम सुरू करीत असल्याचे आश्वासन दोन्ही मंत्रीमहोदयांनी दिल्यानंतर व्यंकटेश शिंदे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. भुयारी गटार योजना, उखडलेले रस्ते, नवीन विद्युत पोल, पाणी पुरवठा योजना, आवश्यक त्या ठिकाणी रस्ते अशा विविध सार्वजनिक मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदेयांनी 15 नोव्हेंबरला उपोषणास सुरूवात केली होती.
टिप्पणी पोस्ट करा