एसटी संप चिघळण्याची चिन्हे; धुळ्यात चार बसवर दगडफेक
▪️ एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात गेल्या 14 दिवसांपासून बससेवा पुर्णता बंद झाली होती. धुळ्यातील आगारात सुकसुकाट बघावयास मिळत होता.
▪️ आज पोलीस प्रशासानच्या बंदोबस्तात धुळे आगारतून बससेवा सुरु करण्यात आली. मात्र, काही वेळानंतर एसटींवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी एक चालक जखमी झाला आहे.
▪️ एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून लालपरी कुठेही बाहेर पडलेली नव्हती. मात्र, तब्बल 14 दिवसानंतर पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेत धुळे आगारातील बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
▪️ आज सकाळी चार बसेस सोडण्यात आल्या होत्या. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसताना, संप सुरू असताना प्रशासनाने बसेस सुरू करू नये, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती.
▪️ तर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. मात्र, धुळे आगार प्रशासनाने पोलीसांच्या बंदोबस्त चार एसटी सुरु केल्या होत्या.
▪️ मात्र, या एसटींवर नगावबारी परिसरात अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. चालक विजय भामरे जखमी झाले आहेत.
▪️ याबाबत प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलीसांच्या बंदोबस्तात सुरु करण्यात आलेल्या एसटींवर देखील दगडफेक झाल्याने नव्याने आलेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा