टीकाकरांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर वाचा काय म्हणाल्या

खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वश्री हिचा विवाह मुंबई येथील पाळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह पार पडला. मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत गाण्याच्या तालावर ठेका धरला. त्यावरुन अनेकांनी काहींनी टीकाही केली. या टीकेसंदर्भात आता खासदार सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.



खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत संसंदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी हजर आहेत. तत्पूर्वी एक दिवस अगोदर मुंबईत खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती होती. मात्र, या सोहळ्यातील डान्समुळे त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. ‘तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. त्यामध्ये, बाहेरचं कुणीच नव्हतं.


तसेच त्या पुढे म्हणाल्या की, एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो, त्यावरही कुणाला टीका करायची असेल तर काय बोलणार?,’ असा प्रतिप्रश्न करत सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्यासमेवतच्या डान्सवरील टीकेला उत्तर दिलं आहे. काल संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर अनेकांनी यावेत टीका केली होती तसेच भाजपा नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सुद्धा निशाणा साधला होता.