टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या



● जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया एकीकृत करा; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

● मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानचा जामीन आदेश जारी, तुरुंगाबाहेर येण्यासाठी मान्य कराव्या लागणार काही अटी 

● बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

● लोकप्रिय कन्नड अभिनेते पुनित राजकुमार यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, चित्रपट रसिकांना मोठा धक्का 

● 'मन्नत'वर जल्लोष, आर्यनला जामीन मिळताच शाहरुखच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी; पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

● अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर आजपासून जमा होणार मदत, 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

● ‘बॉलिवूड’ला बदनाम करून ‘यूपीवूड’ कधीच तयार होणार नाही; नवाब मलिकांनी योगी आदित्यनाथांना सुनावले

● दुर्देव..! 2020 मध्येही महाराष्ट्रातच सर्वाधिक आत्महत्या, ‘एनसीआरबी’ चा अहवाल  

● यंदा सण साजरा करताना खिशाला बसणार महागाईची झळ; महिनाभरात पेट्रोल, डिझेलमध्ये भरमसाठ वाढ, तर सारखेचे भावही 5 रुपयांनी वाढले  

● भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसची राजकारणात उडी; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश