आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?

आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?


गेल्या दोन वर्षणापासून कोरोना आजरावर अनेक उपाय आणि संशोधन करण्यात आले आहे. आता कोरोना वरील लास देखील आल्या आहेत. मात्र तरी देखील कोरोनाचे प्रमाण कमी झालेले नाही आता यासाठी एक प्रतिबंधक गोळी विकसित केली जात आहे. 


कोण तयार करतंय गोळी?

- फायझर ही अमेरिकी कंपनी कोरोनाप्रतिबंधक गोळी तयार करत आहे

- त्यासाठी कंपनीकडून चाचण्या सुरू आहेत

- गोळी आल्यास लसीला एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकणार 

       

कसे काम करणार ही गोळी? 

- ही गोळी घेतल्यास संसर्ग होण्याची शक्यताही मावळते

- कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरी धोका नाही

- ही गोळी शरीरात गेल्यानंतर प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करते

- सर्व रक्तपेशींना उ्ददिपीत करून बाह्यसंकटापासून संरक्षण देते


कशी आहे गोळी?

- ही अँटिकोरोना गोळी सामान्य गोळीप्रमाणेच असेल

- ही गोळी कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी असेल

- प्राथमिक लक्षणांवेळीच ही गोळी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल

- ही गोळी पूर्णत: कोरोनाकेंद्रितच आहे


वैज्ञानिक चाचण्या कशा होणार?

- गोळीची चाचणी फायझर २६०० जणांवर केली जाणार

- काही जणांना प्रत्यक्ष गोळी दिली जाईल तर काहींना प्रतिकात्मक औषध

- पाच ते दहा दिवस ही गोळी दिली जाईल

-  दिवसातून दोनदा असे प्रमाण असेल.

- १८ वर्षांवरील लोकांनाच चाचणीत सहभागी होता येणार 

- पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील

- गोळीला मंजुरी देण्यासाठी अमेरिकी एफडीएकडे अर्ज करता येणार