परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती पोलिसांनी तीघांना ठोकल्या बेड्या

परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती पोलिसांनी तीघांना ठोकल्या बेड्या


●  एकीकडे पाच दहा ग्राम गांजा बाळगल्याने अटक झालेल्या आर्यन खानमुळे राज्यभर आरोप प्रत्यारोप सुरू असताना, बीड जिल्ह्यात चक्क गांजाची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना अटक केलीय.

●  सिनेअभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज (गांजा) प्रकरणी अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे यांचा जात धर्म काढत आरोपांची राळ उठवली. दहा पाच ग्राम गांजा सापडल्या नंतर जिथं मुंबई किंवा दिल्लीचे पोलीस मोठी कारवाई करतात तिथं बीड जिल्ह्यात मात्र गांजा सर्रास शेतात पिकवला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील मोहा गावात अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता, शेकडो एकर जमिनीवर अफूची शेती होत असल्याचे समोर आल्यानंतर शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते, आता याच तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

●  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात असलेल्या हाळंब गावात गांजाची सामूहिक शेती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांनी या शेतीवर छापा घातला असता सामूहिक गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना ताब्यात घेतले असून दोन क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे.