जितेंद्र आव्हाड हमाम मे सब नंगे वाचा सविस्तर
क्रुझवर 4 हजार लोक होते. मात्र, त्यातील फक्त 6 जणांनाच पकडलं, हे काही कळलं नाही. मी पहचान कौन? हे ट्वीट केलं आणि नंतर डिलीट केलं. कारण मला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं, ते पोहोचलं, म्हणून डिलीट केलं. क्रांती रेडकरांनी थोडं सांभाळून बोलावं. मागचा इतिहास जर काढला तर लक्षात येईल की हमाम मे संब नंगे. सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं की समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट बोगस आहे. त्यामुळे सर्टिफिकेटबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट झालीय, त्यांचं अभिनंदन’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मलिकांच्या आरोपाला क्रांती रेडकरंचं उत्तर
“निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज Act अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाली.
‘त्यांनी माहिती घ्यायला हवी होती’
“स्पेशल मॅरेज Act अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती लग्न करतात. त्यांनी धर्म लपवल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. त्यावर नवरा-बायको दोघांच्या सह्या आहेत. मी हिंदू असल्याने इस्लाम धर्माची तेवढी मला माहिती नाही. पण मौलानांनी संविधानानुसार पाहिलं तर समीर तेव्हाही हिंदू होते. त्यांनी माहिती घ्यायला हवी होती” असं क्रांतीने म्हटलंय.
नवाब मलिक नेमकं काय म्हटले?
“माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीय, हे मला सगळ्यांसमोर आणायचंय. खोटा जातीचा दाखला देऊन त्यांनी नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे. एका अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली. गरिब वंचित व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता. त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की त्यांची नोकरी नक्की जाईल.”
टिप्पणी पोस्ट करा