पंचनाम्याचा फार्स नको तर शेतकऱ्यांना सरसकट थेट मदत द्या - विनायक मेटे
● बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.
● बीड तालुक्यातील घोडका राजुरी गावातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून, यावेळी पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करत त्यांनी सदरील प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे.
● दरम्यान मध्यरात्री झालेल्या मनकर्णीका तलाव ओसंडून वाहत असल्यानं पाटेगाव सुर्डी आणि मुगावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून ग्रामस्थांना वाट शोधावी लागतेय. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून मेटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
● सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले खरे मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलेला नाही.
● सरसकट पंचनामे न करता सॅटेलाईट द्वारे पडताळणी झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी, तरच हे सरकार शेतकऱ्यांचं हे म्हणण्याचा अधिकार आहे.
टिप्पणी पोस्ट करा