नाशिकमध्ये मुलीला बळजबरीनं लॉजवर नेऊन विनयभंग



Nashik Crime News

नाशिकमध्ये पुन्हा एकदा विनयभंगाचीघटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला बळजबरीनं लॉजवर नेऊन विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; चौघांना अटक

शनिवारी नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातली ही घटना आहे. शाळेत जाणाऱ्या मुलीला तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावलं असं सांगून आरोपीनं कारमध्ये बसवलं. मुलगी कारमध्ये बसल्यानंतर आरोपीनं कार लॉजवर नेली आणि तिथं तिच्यावर अतिप्रसंग केला.

हेही वाचा- आर्यन खान बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार क्रूझवर होते वाचा सविस्तर 

पीडित मुलीनं घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी दानिश खानला मारहाण केली आहे. सध्या आरोपी दानिशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- कानात आवाज येण्याची कारणे - कानात आवाज ऐकू येणे

आरोपी दानिश खान विरोधात काल संध्याकाळी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिडीत मुलीच्या कुटुंबियांचा ओळखीतील व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.