नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; चौघांना अटक



● नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. 

● या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली तर तीन संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. मात्र या घटनेमुळे नागपूर शहरात नेमकं चाललं तरी काय असे प्रश्न उपस्थित होत आहे.

● याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेले असतां अचानक तिथे पोहचलेल्या काही अज्ञात व्यक्तीनी मित्राला मारहाण करून पीडितेवर सामूहिक अत्याचार केला अशी तक्रार पोलिसांकडे आली.

● पण पोलीस तपास करत असताना मुलीच्या मित्रानेच पैसे घेऊन मुलांना बोलावले असल्याचं उघडकीस आले. 

● या प्रकरणात एकूण सात आरोपी असून यात मुलीच्या मित्रा सह चार जणांना अटक करण्यात आली, असून तिघांचा शोध सुरू आहे.

● पोलिसांनी मुलीची मेडिकल चाचणी करून घेतली असून ती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे..