शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय!



✈️ शिर्डी विमानतळाच्या भोवती सर्व सोयींनीयुक्त असं एक शहर वसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

💁‍♂️ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. 

🧐 शिर्डी परिसराची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज ७६ वी बैठक पार पडली. 

👉 वर्षा येथील समिती कक्षात ही बैठक झाल्यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

🗣️ “विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. 

📍 एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या विकसित भागाचे नाव असेल”, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.